गेल (इंडिया) मध्ये विविध 233 पदांसाठी भरती 05 नोव्हेंबर, 2016 पर्यंत

गेल (इंडिया) मध्ये विविध 233 पदांसाठी भरती
भारत सरकारच्या नवरत्न सार्वजनिक उपक्रमांपैकी एक अत्यंत महत्वाचा उपक्रम म्हणून गेल (इंडिया) लिमिटेड हा उपक्रम ओळखला जातो. या उपक्रमातील सेवा ही केवळ आर्थिक संरक्षणच देत नाही तर अत्यंत व्यावसायिक, सामाजिक प्रतिष्ठा देखील मिळवून देते.

या उपक्रमाच्या आगामी पाईपलाईन प्रकल्पाकरिता मार्केटिंग, मनुष्यबळ, कार्यालयीन भाषा, वित्त व लेखा, केमिकल, भांडार व खरेदी, मेकॅनिकल, पॉलिमर, सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, टेलिकॉम व टेलीमेट्री, लॅबोरेटरी या शाखांतील ई-1,एस-7,एस-5 व एस-3 श्रेणीतील 233 पदे भरण्यासाठी आवश्यक त्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

श्रेणीनिहाय पदांची संख्या, शाखा, पात्रता, अर्हता, ऑनलाईन अर्ज प्रारुप भरण्यासाठीच्या सर्वसाधारण अटी व निर्देश यांच्या विस्तृत माहितीकरिता कृपया ‘गेल’च्या वेबसाईट www.gailonline.com ला करियर अनुभागाला दि. 05 नोव्हेंबर, 2016 पर्यंत भेट द्यावी.

या भरतीसंदर्भातील कोणतीही सुधारणा, स्पष्टीकरण, शुद्धीपत्रक, वेळेतील विस्तार आदीसंदर्भातील माहिती गेल वेबसाईट www.gailonline.com या करियर सेक्शनवर प्रदर्शित आहे. यासाठी वर्तमानपत्रात कोणतीही वेगळी अधिसूचना दिली जाणार नाही. उमेदवारांनी यासंदर्भात अद्ययावत राहण्यासाठी कृपया वेबसाईटला नियमित स्वरुपात भेट देत राहावी.

नोंदणीकृत कार्यालय
गेल भवन, 16, भिकाजी कॉम्प्लेक्स,
आर. के. पूरम,
नवी दिल्ली – 110 066
सीआयएन : L40200DL1984GOI018976
दूरध्वनी क्र. 011-26172580
Email- career@gail.co.in

फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेत करिअरची संधी

NIFT नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने नुकतीच विविध पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. पदांचे नाव, पदांची संख्या, वेतनश्रेणी आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.


Visit: Establishment & Careers

1) कॅम्पस डायरेक्टर - या पदासाठी अनुसूचित जाती-02 पदे व युआर-02 पदे अशी एकूण 04 पदे आहेत. या पदासाठी रु. 37,400-67,000 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी पदव्युत्तर पदवी किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह/ॲकॅडमिक/मॅनाजिरिकल या समकक्ष विषयातील 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

2) डायरेक्टर (फायनान्स ॲण्ड अकांऊंटस) – यासाठी 01 पद आहे. या पदासाठी रु. 37,400-67,000 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी उमेदवार इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकाऊंटंट ऑफ इंडिया या संस्थेतून चार्टड अकाऊंटंट झालेला असावा.

3) प्रोजेक्ट इंजिनियर – यासाठी 01 पद आहे. या पदासाठी रु. 37,400-67,000 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी उमेदवार विद्यापीठ किंवा प्रख्यात संस्थेतून एम.ई. (सिव्हिल इंजिनियरिंग) झालेला असावा. तसेच त्याला सीपीडब्ल्युडी/पीडब्ल्युडी मधील एक्झीक्युटीव्ह इंजिनियरचा 05 वर्षाचा अनुभव असावा.

4) रजिस्ट्रार - यासाठी 01 पद आहे. या पदासाठी रु. 15,600-39,100 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी उमेदवार केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम यातील अनुभव असलेला असावा.

5) डेप्युटी डायरेक्टर (फायनान्स ॲण्ड अकाउंटस) – या एकूण 07 पदे आहेत. या पदासाठी रु. 15,600-39,100 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट ॲण्ड वर्क अकाऊंटंट ऑफ इंडिया मधून कॉस्ट अकाऊंटंट पात्रता प्राप्त केलेली असावी.

6) अकाऊंटंट ऑफिसर – यासाठी 01 पद आहे. या पदासाठी रु. 15,600-39,100 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी विद्यापीठ/प्रख्यात संस्थेमधून एमबीए फायनान्स ही पात्रता प्राप्त केलेली असावी.

7) पीबी- 3 व्हिजीलन्स ऑफिसर – यासाठी 01 पद आहे. या पदासाठी रु. 15,600-39,100 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी केंद्र सरकार मधील समकक्ष अनुभव/किमान 3 वर्षाचा अनुभव असावा.

8) असिस्टंट डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर – यासाठी 01 पद आहे. या पदासाठी रु. 15,600-39,100 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी एमई/एमसीए/एमटेक/एमएस्सी (सीएस/आयटी) ही पात्रता आवश्यक असून ॲकॅडमीक इन्स्टिट्यूशनचा 05 वर्षाचा अनुभव तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अनुभव असणे आवश्यक आहे.

9) सॉफ्टवेअर इंजिनियर – यासाठी 01 पद आहे. या पदासाठी 9,300-34,800 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी उमेदवाराकडे बीसीए/बीटेक/बीएस्सी (सीडी/आयटी) अशी पात्रता असणे आवश्यक आहे.

10) ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनियरस् – यासाठी 03 पदे आहेत. या पदासाठी रु. 5,200-20,200 अशी वेतनश्रेणी आहे. या पदासाठी उमेदवाराकडे बीसीए/बीटेक/बीएस्सी (सीडी/आयटी) अशी पात्रता असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी कॅम्पस डायरेक्टर, डायरेक्टर (फायनान्स ॲण्ड अकाऊंट्स) ॲण्ड प्रोजेक्ट इंजिनियर या नावे शुल्क भरावयाचे असून खुल्या वर्गासाठी रु. 1,000/- तर अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी रु. 500/- इतके शुल्क आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर, 2016 अशी आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया www.nift.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

वनसंरक्षक, वनविभाग, ठाणे व पालघर प्रादेशिक कार्यालय.

🌳 वनविभाग, ठाणे व पालघर प्रादेशिक कार्यालय.
🌳
पदाचे नाव : वनसंरक्षक (पुरुष, स्त्री)
 Download सुधारित वनरक्षक भरती जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्‍त
🔢 एकूण पदसंख्या : ११९
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (गणित किंवा विज्ञान किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एका विषयासह)
वेतनश्रेणी : रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे रु.१८००/-
वयोमर्यादा : वय १८ ते ओपन २५, इतर ३० वर्ष
✍ फॉर्म कसा भरावा : ऑनलाईन ( http://www.mahaforest.nic.in )
परीक्षा शुल्क : खुला - रु.३००/-, इतर - रु.१५०/-
📅 अंतिम दिनांक : १७ ऑक्टोबर २०१६, सायं. ५ वाजेपर्यंत
शारीरिक व मैदानी चाचणी साठी दि.२० ऑक्टोबर २०१६ पासून सुरुवात होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
📅 शारीरिक पात्रता तपासणे (उंची, वजन, छाती) दिनांक : २२ ते २४ ऑक्टोबर २०१६
📅 शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची धावण्याची (५ किमी/ 3 किमी) चाचणी घेणे दिनांक : २२ ते २४ ऑक्टोबर २०१६
📅 धावण्याच्या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व इतर अहर्ता तपासणे दिनांक : ०९ ते ११ नोव्हेंबर २०१६
📅 शैक्षणिक व मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ४ तासात (२५ किमी / १६ किमी) अंतर चालण्याची चाचणी घेणे दिनांक : २० नोव्हेंबर २०१६
📅 ४ तासात (२५ किमी / १६ किमी) अंतर चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचे वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे दिनांक : २१ ते ३० नोव्हेंबर २०१६
📅 वरील सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्याचे आदेश दिनांक : ०१ डिसेंबर २०१६

मुंबई विद्यापीठाचे दूरशिक्षण

मुंबई विद्यापीठ हे भारतातील विद्यापीठांपैकी एक जुने आणि प्रमुख विद्यापीठ आहे. ‘वुड्स शैक्षणिक योजने’ अंतर्गत मुंबई विद्यापीठाची स्थापना सन 1857 मध्ये झाली. या विद्यापीठाने भारतातील प्रथम तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मिळवला. ‘बाँम्बे’ शहराचे ‘मुंबई’ असे नामकरण झाल्यामुळे विद्यापीठाचे नाव ‘बाँम्बे विद्यापीठ’ ऐवजी ‘मुंबई विद्यापीठ’ असे झाले. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, पुरुष, महिला, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी यांना उच्च शिक्षण घेण्याची आवड व गरज असते. पण ते काही कारणाने नियमित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही अशांसाठी मुंबई विद्यापीठाने दूरशिक्षण विभाग सुरु केला आहे. विद्यापीठाने नुकतीच दूरशिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाची घोषणा केली आहे.

बी.ए., बी.कॉम., बीएस्सी. (संगणकशास्त्र), बीएस्सी. (माहिती तंत्रज्ञान) प्रथम व द्वितीय वर्ष बीएस्सी. (नॉटिकल टेक्नॉलॉजी) द्वितीय व तृतीय वर्ष, एम.ए. (इतिहास,समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती), एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.कॉम. (अकांऊंटस्/व्यवस्थापक), एम.ए./एम.एस्सी. (गणित),एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र). पीजीडीएफएम (पीजी डिप्लोमा इन फिनान्शियल मॅनेजमेंट), पीजीडीओआरएम (पीजी डिप्लोमा इन ऑपरेशन्स रिसर्च फॉर मॅनेजमेंट) (एक वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून). पीजीडीएफएम आणि पीजीडीओआरएम द्वितीय वर्ष (जुना पॅटर्न) या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर, 2016 पर्यंत आहे.

काही अभ्यासक्रमांसाठी शासनाची शिष्यवृत्ती राखीव प्रवर्गासाठी (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्ग/व्हीजे-एनटी/एसबीसी) उपलब्ध आहे. त्याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर पहावी.

या अभ्यासक्रमांसाठी हेल्पलाईन : एसएमएस सेवा : आयडॉलचे विद्यार्थी एसएमएसद्वारे माहिती विचारु शकतील. यासाठी कृपया टाईप करा IDOL एक स्पेस द्या व तुमच्या ईमेलसहित आपला मेसेज टाईप करा व 8082892988 या क्रमांकावर पाठवा. आपल्याला एसएमएस/ईमेलद्वारे संबंधित माहिती दिली जाईल.

या अभ्यासक्रमांसाठी आयडॉलचे स्वत:चे शिक्षण केंद्र ठाण्यामध्ये बाळकूम, रुनवॉल गार्डन, ठाणे-भिवंडी रोड, बाळकूम ऑक्ट्रॉय नाका, ठाणे - 400 608 येथे तर रत्नागिरीमध्ये प्लॉट नं. पी-61, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी येथे शिक्षण केंद्र आहे.

या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेशाची विस्तारीत माहिती http://mu.ac.in/portal/distance-open-learning किंवा www.idoluom.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संस्थेचा पत्ता :
मुंबई विद्यापीठ
दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल),
डॉ.शंकर दयाळ शर्मा भवन, विद्यानगरी,
कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400098.
दूरध्वनी क्र. – 022-26523048
एसएमएस सेवा - 8082892988
ईमेल – info@idol.mu.ac.in, idol.uom@roups.facebook.com, Twitter@idol.¬¬uom, RadioMust-107.8FM

शास्त्रज्ञ बना ! इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित 'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने संस्थेत तसेच अन्य संलग्न संस्थांमध्ये सायंटिस्ट 'बी' या पदांसाठी भरतीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

या पदांसाठी उमेदवार हे बीई/बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनियरिंग, बीई/बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक/बीई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) किंवा बीटेक/बीई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन), एमएस्सी (फिजिक्स) किंवा एमएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स/अल्पाईड इलेक्ट्रॉनिक्स) विथ वन इअर ऑफ रिलेव्हन्ट एक्स्पीरिअन्स ही पात्रता धारण केलेले असावेत. विविध संस्था आणि संवर्ग मिळून एकूण 128 पदांसाठी ही भरती आहे. या पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि दिव्यांग उमेदवांरासाठी काही पदे आरक्षित आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. 24 ऑक्टोबर, 2016 रोजी 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग उमेदवारांसाठी तसेच सरकारी नोकर, माजी सैनिक आणि अन्य विशेष संवर्गातील उमेदवारांसाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा शिथिलक्षम आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला भारतात कुठेही सेवा करावी लागेल.

पदांचा तपशील, आवश्यक पात्रता, जागेची उपलब्धता, आरक्षण आणि अन्य बाबींसाठी उमेदवारांनी कृपया (1) meity.gov.in (2) cert-in.org.in (3) stqc.gov.in (4) ncs.gov.in (5) nielit.gov.in (6) ccdisabilities.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर, 2016 अशी आहे.

संस्थेचा पत्ता
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,
इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, 6, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड,
नवी दिल्ली – 110003.
दूरध्वनी क्र. (भारत)- 011-23644849,149

नवोदय विद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत समाविष्ट नवोदय विद्यालय समितीमध्ये सहायक आयुक्त, प्राचार्य, स्नातकोत्तर शिक्षक, प्रशिक्षित स्नातक शिक्षक तसेच तृतिय भाषा शिक्षकांच्या पदभरती प्रक्रियेकरीता पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून निवासी शाळेतील अनुभवी शिक्षकांस प्राधान्य आहे.

नवोदय विद्यालय समितीची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थांना मोफत आणि उत्तम शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने समितीस निरनिराळ्या सोयीसुविधांसाठी वेळोवेळी दिलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे आज देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातील नवोदय विद्यालय देशाचे आधारस्तंभ उभे करण्यात यशस्वी होत आहेत.

येथील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया काहिशी किचकट आहे कारण होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची निवड होत असल्यामुळे काठिण्य पातळी उच्च दर्जाची ! मात्र एकदा शिक्षक म्हणून रुजू झालात की मूलं आणि शिक्षक यांच्यात पुरातन गुरु शिष्य परंपरेची नव्याने प्रचिती आल्याशिवाय रहात नाही.

नवोदय विद्यालयात नोकरी करण्यासाठी बरेचदा दुर्गम भागात जाण्याची जिद्द आणि मानसिक तयारी ठेवावी लागते. मात्र मुलांबरोबर शिक्षकांकरीता सर्व सोयी उपलब्ध असतात. सुसज्ज निवास, उत्तम आणि पौष्टीक जेवण, फलाहार, खेळायला मोठे क्रीडांगण, शिकविण्यासाठी नवनवीन तंत्र, निरामय आरोग्यास पोषक वातावरणाबरोबरच शाळेत एक डिस्पेंसरी आणि प्रशिक्षित रुग्णसेविका या आणि अशा सर्व सुविधांमुळे मन सहज रमून जातं आणि समाजसेवेचं आत्मिक समाधानही लाभतं.

विविध पदांची वेतन श्रेणी आणि वयोमर्यादा, विषय निहाय पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत, वयोमर्यादेतील सवलत, फॉर्म फी मधील सवलत, परीक्षा पद्धती, परीक्षा केंद्र तथा इतर सर्व तपशीलवार माहितीकरीता उमेदवारांनी www.nvshq.org किंवा www.mecbse.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी.

ऑनलाइन अर्ज दिनांक 9 ऑक्टोबर 2016 (रात्रीचे 12 वाजता) पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. फॉर्म फी दिनांक 14.10.2016 पर्यंत स्वीकारली जाणार असून फॉर्म फी चलनाद्वारे बँकेत भरावयाची आहे. महिला उमेदवार तथा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांना फॉर्म फी मधून सवलत आहे. अर्ज फक्त ऑनलाइन भरून अर्जाची प्रिंट आणि कागदपत्रांच्या प्रती पुढील भरती प्रक्रियेकरिता स्वतः जवळ ठेवावयाच्या आहेत. तरीही संबंधीत पात्र उमेद्वारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या करिअर सोबत विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोने करावे याकरीता शुभेच्छा !