*मध्य रेल्वेत २१९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया*
मध्य रेल्वेने आपल्या २१९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया अॅप्रेन्टिस पदांसाठी असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
या पदांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी निवड झाल्यानंतर त्यांची मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर या विभागांत नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवार ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.
पात्रता:
पात्र उमेदवार हा मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून कमीत कमी ५० टक्के मार्क्ससह १०वी पास हवा. तसेच पात्र उमेदवार हा संबंधित ट्रेडमधून आयटीआय पास झालेला हवा किंवा १२वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा:
पात्र उमेदवाराचं वय कमीत कमी १५ वर्ष आणि जास्तीत जास्त २४ वर्ष असावं. म्हणजेच पात्र उमेदवाराची जन्म तारीख १ नोव्हेंर १९९३ ते १ नोव्हेंबर २००२ या दरम्यान असावी. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे.
परीक्षा फी:
खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये परीक्षा फी द्यावी लागणार आहे. ही फी एसबीआय पेमेंट गेटवेच्या माध्यमातून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करता येईल. एससी, एसटी, अपंग आणि महिला उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागणार नाहीये.
असा करा अर्ज...
इच्छुक उमेदवार मध्य रेल्वेच्या https://www.rrccr.com
या वेबसाईटवरुन नोटिफिकेशन (RRC/CR/AA1/2017) वर क्लिक करुन संपूर्ण जाहिरात पाहू शकतात. या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून उमेदवारांनी अर्ज दाखल करावा. त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड फॉर ऑनलाईन अॅप्लिकेशनवर क्लिक करुन अर्ज भरण्यास सुरु करु शकता
या वेबसाईटवरुन नोटिफिकेशन (RRC/CR/AA1/2017) वर क्लिक करुन संपूर्ण जाहिरात पाहू शकतात. या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून उमेदवारांनी अर्ज दाखल करावा. त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड फॉर ऑनलाईन अॅप्लिकेशनवर क्लिक करुन अर्ज भरण्यास सुरु करु शकता
नोकरी रोजगार उद्योग व्यवसाय
https://fb.com/udyogmarathi
https://fb.com/udyogmarathi