मुंबई महानगरपालिका चतुर्थ कामगार भरती

*मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या १३८८ जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी ११ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून ३१ डिसेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहे.*

 *कुठे कराल अर्ज* ?

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज http://  *porter.mcgm.gov.in* या किंवा  *mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in*  या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

*कोणत्या पदांसाठी भरती?*
जलविभाग,
आरोग्य खाते,
रुग्णालये,
मलनि:सारण
कक्षपरिचर,
हमाल,
आया
स्मशान कामगार
आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त असून या सर्व विभागांत आदी वर्गांतील १३८८ रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

*कोणत्या वर्गासाठी कितीजागा?*
प्रवर्गजागाखुला प्रवर्ग ५൦४
अनुसूचित जाती २२३
अनुसूचित जमाती १०८
विमुक्त जाती ४८
भटक्या जमाती ब ३४ भ
टक्या जमाती क ५१
भटक्या जमाती ड ३२
विशेष मागासवर्ग ३२
इतर मागासवर्ग(ओबीसी) ३५६
एकूण १३८८

*पात्रता निकष*
शिक्षण - किमान दहावी मराठी विषयासह उत्तीर्ण
 *पुरूष -*
किमान वजन - ५० कि.ग्रॅ.
किमान उंची - १७५ सेंटीमीटर
 *महिला -*
किमान वजन - ४५ कि.ग्रॅ.
किमान उंची - १५० सेंटीमीटर

 *ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक*
ऑनलाईन अर्ज सुरु : सोमवार ११ डिसेंबर २०१७
ऑनलाईन अर्जांची शेवटची तारीख : रविवार ३१ डिसेंबर २०१७ (२३.५९ वाजेपर्यंत)
'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या शाखेत शुल्क स्वीकारण्याचा कालावधी : ११ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८
ऑनलाईन परिक्षेसाठी प्रवेशपत्र मिळण्याची तारीख :१५ जानेवारी २०१८
ऑनलाईन परीक्षा : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा
उमेदवारांना परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबतची माहिती : फेब्रुवारी महिन्याचा चौथा आठवडा
अंतिम निवड यादी : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा

No comments:

Post a Comment