अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकत असलेल्या स्त्री आणि पुरुषांना युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमअंतर्गत भारतीय नौदलांत करिअर करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. २५ जून-०१ जुलै २०१६च्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये या प्रवेशाविषयी निवेदन प्रसिद्ध झाले आहे.
पात्रता :
१) बी.ई./ बी.टेक. पदवीचे शेवटच्या वर्षांत शिकणारे स्त्री व पुरुष.
२) कोणत्याही वर्षी एकही विषयाचा बॅकलॉग नसावा.
३) बी.ई./ बी.टेक.च्या आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये सरासरी ६० टक्क्य़ां हून अधिक गुण.
४) बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय घेऊन बारावी पूर्ण केलेला तरुण/ तरुणी.
५) जून २०१७ पर्यंत बी.ई./ बी.टेक. पूर्ण होऊन अभियांत्रिकी पदवीच्या सर्व वर्षांचे सरासरी गुण ६० टक्क्यांहून अधिक.
६) वय २३ वर्षांचे आतील (अर्ज करताना) जन्मतारीख ०२ जुलै १९९३ नंतर असणे जरुरी.
७) पायलट तसेच ऑब्झव्र्हरसाठी १६२.५ सेंटिमीटर (५ फूट ४ इंच)हून अधिक उंची असणे आवश्यक (स्त्री/ पुरुषांसाठी)
८) पायलट आणि ऑब्झव्र्हर ब्रँच/ केडरव्यतिरिक्त असलेल्या ब्रँचेसकरिता पुरुषांची उंची १५७ सेंटिमीटर (५ फूट २ इंच) हून अधिक तर स्त्रियांची उंची १५२ सेंटिमीटर (५ फूट ) हून अधिक.
ब्रँच / केडर
युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमअंतर्गत/ पुरुषांना जनरल सव्र्हिस (एक्स) ब्रँचमध्ये परमनंट कमिशन मिळू शकते. महिलांना या एंट्रीअंतर्गत पायलट, ऑब्झव्र्हर, नेव्हल आर्किटेक्चर या ब्रँचेसमध्ये शॉर्ट सव्र्हिस कमिशन मिळू शकते तर पुरुषांसाठी शॉर्ट सव्र्हिस कमिशन पायलट, ऑब्झव्र्हर, जनरल सव्र्हिस (एक्स), आय. टी. टेक्निकल (इंजिनीअरिंग), टेक्निकल (इलेक्ट्रिकल), टेक्निकल (नेव्हल आर्किटेक्चर), सबमरीन (इंजिनीअरिंग) आणि सबमरीन (इलेक्ट्रिकल) या ब्रँचेसमध्ये मिळण्याची सुविधा आहे.
वरील दिलेल्या सर्व ब्रँचेसमध्ये अभियांत्रिकी पदवीच्या सर्व ब्रँचेसचे तरुण/ तरुणी अर्ज करू शकत नाहीत. पायलट आणि ऑब्झव्र्हर ब्रँचसाठी बी.ई./ बी.टेकच्या सर्व ब्रँचचे तरुण / तरुणी अर्ज करण्यास पात्र आहेत. मात्र इतर ब्रँचेसमध्ये जाण्यासाठी विशिष्ट ब्रँच असणे आवश्यक आहे. या सर्व माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूज पाहावा अथवा भारतीय नौदलांच्या www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर पाहावे.
अर्ज करण्याची पद्धत – १) उमेदवाराने ०७ ऑगस्टच्या आत अर्ज करणे जरुरी आहे.
२) अर्ज ऑनलाइन (ई- अॅप्लिकेशन) भरणे जरुरी आहे.
३) अर्ज करण्याआधी ww.joinindiannavy.gov.in संकेतस्थळांवर भेट द्यावी तसेच २५ जून – ०१ जुलै २०१६च्या एम्प्लॉयमेंट न्यूजमधील निवेदनातील फॉर्म भरण्याविषयी दिलेल्या सूचना वाचाव्यात. ४) अर्जदाराने एकच अर्ज करायचा आहे. जरी तो दोन किंवा अधिक ब्रँच/ केडरसाठी पात्र असला तरीदेखील एकच अर्ज करावयाचा आहे. दोन अर्ज केल्यास उमेदवारी रद्द केली जाते. जर दोन / तीन ब्रँच / केडरला पात्र असल्यास उमेदवाराने प्राधान्यक्रम द्यावा. ५) अर्ज केल्यानंतर तो सिस्टीम जनरेटेड अॅप्लिकेशन नंबरसह तो अर्ज तयार होतो. त्याची एक प्रिंट घ्यावी. कॅम्पस इंटरव्हय़ूच्या वेळी तो फॉर्म व १० वी, १२ वी तसेच अभियांत्रिकी पदवीचे सर्व मार्कशीट्सबरोबर ठेवाव्यात. ६) अर्जाच्या शेवटी असलेल्या जाहीरनाम्यावर प्राचार्य अथवा हेड ऑफ डिपार्टमेंट (एचओडी)ची स्वाक्षरी घ्यावी.
निवड पद्धती –
अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना नेव्हल कॅम्पस सिलेक्शन टीमच्या मुलाखतीस सामोरे जावे लागेल. कॅम्पस इंटरव्हय़ू क्वालिफाय करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या ब्रँच/ केडरच्या पसंतीच्या आधारावर एस.एस.बी. मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात येईल. ब्रँड/ केडरची निवड नेव्हल हेडक्वॉर्टर व्हेकन्सीजच्या आधारावर करेल. एस.एस.बी. मुलाखत बंगळुरू/ भोपाळ/ कोइम्बतूर/ विशाखापट्टनम येथे डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या काळात होईल. एस.एस.बी. मुलाखत दोन टप्प्यांत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन अॅण्ड डिस्कशन टेस्ट हे सेंटरवर पहिल्या दिवशी घेण्यात येते आणि या टप्प्यात क्वालिफाय न झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी घरी पाठविण्यात येते. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात पहिल्या दिवशी मानसिक चाचणी व पुढील दोन दिवसांत सामूहिक परीक्षणाला सामोरे जावे लागते. याच तीन दिवसांत एके दिवशी वैयक्तिक मुलाखत घेतली जाते, जी साधारणत: तासभर चालते. या परीक्षणानंतर म्हणजे चौथ्या दिवशी सर्व उमेदवारांना १०-१२ ऑफिसर्सच्या पॅनेलसमोर दोन ते तीन मिनिटांसाठी एका छोटय़ा मुलाखतीला सामोरे जावे लागते, ज्यास कॉन्फरन्स (conference) म्हणतात. कॉन्फरन्स झाल्यानंतर दोन-चार तासांत मुलाखतीचा निकाल जाहीर करण्यात येतो. पायलट एंट्रीसाठी असलेल्या उमेदवारांना एस.एस.बी. मुलाखतीव्यतिरिक्त पायलट अॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट (पी.ए.बी.टी.) द्यावी लागते आणि ती क्वालिफाय झाल्यास ते पात्र ठरतात. एस.एस.बी. मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी वैद्यकीय चाचणी सैनिकी रुग्णालयात करण्यात येते. वैद्यकीयदृष्टय़ा पात्र ठरलेले उमेदवार ब्रँच/ केडरमध्ये रिक्त जागांच्या आधारावर त्यांच्या मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर बनलेल्या गुणवत्ता यादीप्रमाणे भारतीय नौदलात प्रवेश मिळतो.
No comments:
Post a Comment