भारत
सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित
'नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' ही
स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने संस्थेत तसेच अन्य
संलग्न संस्थांमध्ये सायंटिस्ट 'बी' या पदांसाठी भरतीची नुकतीच घोषणा
करण्यात आली आहे.
या पदांसाठी उमेदवार हे बीई/बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजिनियरिंग, बीई/बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक/बीई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) किंवा बीटेक/बीई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन), एमएस्सी (फिजिक्स) किंवा एमएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स/अल्पाईड इलेक्ट्रॉनिक्स) विथ वन इअर ऑफ रिलेव्हन्ट एक्स्पीरिअन्स ही पात्रता धारण केलेले असावेत. विविध संस्था आणि संवर्ग मिळून एकूण 128 पदांसाठी ही भरती आहे. या पदांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि दिव्यांग उमेदवांरासाठी काही पदे आरक्षित आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. 24 ऑक्टोबर, 2016 रोजी 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग उमेदवारांसाठी तसेच सरकारी नोकर, माजी सैनिक आणि अन्य विशेष संवर्गातील उमेदवारांसाठी केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादा शिथिलक्षम आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला भारतात कुठेही सेवा करावी लागेल.
पदांचा तपशील, आवश्यक पात्रता, जागेची उपलब्धता, आरक्षण आणि अन्य बाबींसाठी उमेदवारांनी कृपया (1) meity.gov.in (2) cert-in.org.in (3) stqc.gov.in (4) ncs.gov.in (5) nielit.gov.in (6) ccdisabilities.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर, 2016 अशी आहे.
संस्थेचा पत्ता
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,
इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, 6, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड,
नवी दिल्ली – 110003.
दूरध्वनी क्र. (भारत)- 011-23644849,149

No comments:
Post a Comment