भारत
सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन आणि खते मंत्रालय विभागाच्या
सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ प्लास्टिक्स इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी (सिपेट),
औरंगाबाद व महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संयुक्त
विद्यमाने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पात्रता धारक व शारीरिक दृष्ट्या
सक्षम परंतु सद्यस्थितीत शिक्षण घेत नसलेल्या आदिवासी युवक, युवतींकडून
विहीत मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
(1) प्लास्टिक प्रोसेसिंग मशिन ऑपरेशन (पीपीएमओ) - 25, (2) इन्जेक्शन मॉडलिंग मशिन ऑपरेशन (आयएमएमओ) - 15 जागा, (3) एक्सट्रुशन मशिन ऑपरेशन (ईएमओ) - 53, (4) टूल रुम मशिन ऑपरेशन (टीएमओ) - 30 आणि (5) सीएनसी मशिन ऑपरेशन (सीएनसी) - 10 जागा उपलब्ध आहेत. या चारही अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण झालेला असावा. या अभ्यासक्रमांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. या चारही अभ्यासक्रमांचा कालावधी 6 महिने असा आहे.
हे प्रशिक्षण पूर्णकालीन, निवासी व नि:शुल्क असून या प्रशिक्षणादरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येईल व मुलाखतीसाठी येण्या-जाण्याचा खर्च (रेल्वे किंवा बस तिकीट सादर केल्यास) देण्यात येईल. प्रशिक्षण सुरु झाल्यावर उमेदवारास प्रशिक्षणात गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.
या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज व त्यानुषंगिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह दि. 05 ऑक्टोबर, 2016 पर्यंत खालील पत्त्यावर सादर करावेत. त्यानंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पात्रता परीक्षा व मुलाखत दि. 13 ऑक्टोबर, 2016 रोजी होईल.
अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.cipet.gov.in / www.mahatribal.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
पत्ता -
मुख्य प्रबंधक (प्रकल्प),
सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ प्लास्टिक्स इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी (सिपेट),
(रसायन व पेट्रोरसायन विभाग, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार),
प्लॉट नं. जे 3/2, एम.आय.डी.सी. चिकलठाणा,
औरंगाबाद – 431 006.
दूरध्वनी क्र. – 0240-2478316, 317
मोबाईल नं. – 9325687907, 9325687910
फॅक्स –2478333
ईमेल – cipetabad@gmail.com, aurangabad@cipet.gov.in

No comments:
Post a Comment