भारत
सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारित 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज' या संस्थेची स्थापना हैद्राबाद येथे
करण्यात आली. केंद्र व विविध राज्य सरकारे, बँका, सार्वजनिक व खाजगी
क्षेत्रातील उपक्रम, स्वयंसेवी संस्था आणि ग्राम विकासाशी संबंधित
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे,
त्यांना प्रशिक्षण देणे, ग्राम विकासात संशोधन करणे, ग्रामीण भागाचा विकास
करणे अशा विविध उद्दिष्टांसाठी ही संस्था कार्यरत आहे.
या संस्थेच्या वतीने नुकतीच एक वर्ष कालावधीच्या निवासी स्वरुपाच्या ग्रामीण विकास व्यवस्थापनातील पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करणारे उमेदवार हे कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. दि. 01 जानेवारी 2017 पूर्वी पदवी प्राप्त करु शकणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 असा आहे.
या अभ्यासक्रमासाठी दि. 06 नोव्हेंबर 2016 रोजी बंगळूरु, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, गोवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पटना, पुणे व तिरुवनंतपुरम याठिकाणी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा होईल. हे केंद्र वाढविण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार संस्थेस राहील. प्रवेश परीक्षा, समूहचर्चा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळण्यासाठी संस्था सहाय्य करील. परंतु संस्था नोकरीची हमी देत नाही. भारत सरकारच्या धोरणानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षण उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2016 अशी आहे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया www.nird.org.in/pgdrdm.aspx या संकेतस्थळास भेट द्यावी.
संपर्कासाठी पत्ता-
को-ऑर्डिनेटर (ॲडमिशन) सेंटर फॉर पीजी स्टडीज ॲण्ड डिस्टेंस एज्युकेशन (सीपीजीएस अॅण्ड डीई),
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज,
राजेंद्रनगर, हैद्राबाद-500 030
दूरध्वनी क्र. 040-24008460/442/572
टेलीफॅक्स-040-24008522
मोबाईल-8499865285

No comments:
Post a Comment