भारत
सरकारच्या अणु ऊर्जा विभागाच्या अखत्यारित 'न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ
इंडिया लिमिटेड' हा सार्वजनिक उपक्रम कार्यरत आहे. अणु ऊर्जा केंद्रासाठी
संबंधित जागेची निवड, अणु ऊर्जा केंद्राची संकल्पना, बांधकाम, व्यवस्थापन,
देखभाल, नुतनीकरण, दर्जावाढ, प्रकल्पाचा विस्तार, आदी विविध कार्ये या
महामंडळामार्फत केली जातात.
या महामंडळात मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेन्टेशन ॲण्ड सिव्हिल या विषयातील पदवीधर अभियंत्यांकडून एक्झीक्युटीव्ह ट्रेनी या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्जदारांनी गेट 2017 ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विस्तृत माहितीसाठी उमेदवारांनी कृपया http://www.gate.iitr.ernet.in या संकेतस्थळास भेट द्यावी. या महामंडळात काम करणे अत्यंत आव्हानात्मक आणि भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी आहे.
याच महामंडळात टेक्निकल ऑफिसर/डी, सायन्टिफिक ऑफिसर/सी, टेक्निकल ऑफिसर/सी, डेप्युटी मॅनेजर (फायनान्स ॲण्ड अकाऊंटस्), कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. टेक्निकल ऑफिसर/डी, सायन्टिफिक ऑफिसर/सी, टेक्निकल ऑफिसर/सी या तिन्ही पदांसाठी एकूण 43 जागा असून डेप्युटी मॅनेजर (फायनान्स ॲण्ड अकाऊंटस्), कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी प्रत्येकी 1 पद आहे. ही दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम आहे.
अधिक माहितीसाठी उमदेवारांनी कृपया www.npcilcareers.co.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

No comments:
Post a Comment