माजी सैनिक/विधवांचे पाल्य/विधवा यांना आर्थिक मदत

माजी सैनिक/विधवांचे पाल्य/विधवा यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून रक्षा मंत्री विवेकाधीन निधीमधून विविध प्रकारे आर्थिक मदत करण्यात येते. या आर्थिक मदतीचा तपशील, त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्जासोबत लागणारी कागदपत्रे आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी/अंतिम दिनांक यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1) चरितार्थासाठी आर्थिक मदत - माजी सैनिक/विधवा यांच्यासाठी निवृत्तीवेतन धारक नसलेले व वय 65 वर्षे पूर्ण झालेले हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक, वयाबाबतचा पुरावा (ज्यामध्ये जन्मतारीख नमूद आहे), जिल्हा सैनिक कार्यालयाने दिलेले ओळखपत्र, बँक पासबुक प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

2) 100% अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांच्या मुलांसाठी - माजी सैनिक/विधवा यांचे पाल्य यांच्यासाठी 100% अपंगत्व असलेल्या हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक ज्यामध्ये पाल्यांचे नावाची नोंद, 100% अपंगत्व प्राप्त झाल्याबाबतचे मिलीटरी/शासकीय दवाखान्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिकांचे व अवलंबिताचे ओळखपत्र, बँक पासबुक प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

3) मुलीच्या विवाहासाठी/विधवांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत - माजी सैनिक/विधवा यांच्या मुली व माजी सैनिक विधवा यांच्यासाठी हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक ज्यामध्ये पाल्यांच्या नावाची नोंद, मुलीच्या वयाचा दाखला, विवाह नोंदणी दाखला (रजिस्टार/सरपंच), बँक पासबुक प्रत, लाभार्थींनी मुलीच्या विवाहाकरिता शासनाकडून मदत न घेतल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

4) वैद्यकीय आर्थिक मदत - माजी सैनिक/विधवा यांच्यासाठी निवृत्ती वेतन नसलेले हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक, उपचार केलेल्या डॉक्टराची प्रतीस्वाक्षरी केलेली बिलाच्या मूळ बिलासह प्रती, माजी सैनिकांचे/विधवेचे ओळखपत्र, बँक पासबुक प्रत, लाभार्थींनी शासनाकडून मदत न घेतल्याचे प्रमाणपत्र, डिस्चार्ज स्लीप इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

5) एन.डी.ए. कॅडेट आर्थिक मदत - माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिसचार्ज पुस्तक ज्यामध्ये पाल्यांचे नावाची नोंद, जिल्हा सैनिक कार्यालयाने दिलेले ओळखपत्र, एन.डी.ए. कॅडेटची बँक पासबुक प्रत (पीएनबी/एसबीआय फक्त), एनडीए चे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

6) घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत (नैसर्गिक आपत्ती) - माजी सैनिक/विधवा मुली व माजी सैनिक विधवा यांच्यासाठी हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक/प्रमाणपत्र, घर स्वत:च्या नावावरती असलेले प्रमाणपत्र, बँक पासबुक प्रत (पीएनबी/एसबीआय फक्त), पालकांचे मृत्यूची प्रमाणपत्रे (अनाथ मुली), नुकसान झाल्याबाबत शासन/महसूल यांचे प्रमाणपत्र, 100% अपंगत्व प्राप्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र (माजी सैनिक/विधवा), शासनाकडून नुकसान भरपाई न मिळाल्याबाबतचे प्रमाणपत्र, नैसर्गिक आपत्ती घोषित केल्याबाबतचे शासनाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

7) अंत्यविधीसाठी अर्थिक मदत - माजी सैनिकांच्या विधवांसाठी हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक, मुत्यू प्रमाणपत्र, जिल्हा सैनिक कार्यालयाने दिलेले विधवेचे ओळखपत्र, बँक पासबुक प्रत (पीएनबी/एसबीआय फक्त), एडलर्स मदत न मिळाल्याबाबतचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

8) अनाथ पाल्याकरिता आर्थिक मदत - माजी सैनिक/विधवांसाठी हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक/प्रमाणपत्र ज्यांमध्ये पाल्यांचे नावाची नोंद, बँक पासबुक प्रत, पालकांचे मृत्युची प्रमाणपत्रे, जिल्हा सैनिक कार्यालयाने दिलेले अवलंबिताचे ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, विवाह न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

9) माजी सैनिक विधवांना व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदत - माजी सैनिक विधवांसाठी हवालदार/समकक्ष पदापर्यंतची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे डिस्चार्ज पुस्तक, माजी सैनिक विधवेचे ओळखपत्र, प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र, बँक पासबुक प्रत (पीएनबी/एसबीआय फक्त), प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी लाभदायक असल्याचे जि.सै.क.कार्यालयाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

10) पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना - माजी सैनिक विधवा पाल्य/शौर्यपदक धारकांच्या पाल्यांसाठी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सर्व पदधारकाची पात्रता आवश्यक आहे. यासाठी माजी सैनिकांचे प्रमाणपत्र सदर घटनेच्या (प्रपत्र 1 मध्ये दिल्यानुसार), बोनाफाईड प्रमाणपत्र (प्रपत्र 2 मध्ये दिल्यानुसार), पाल्याचे बँक खात्याशी संलग्न असलेले आधारकार्ड (प्रपत्र 3 मध्ये दिल्यानुसार), स्वयं साक्षांकित शालांत परीक्षा प्रमाणपत्र, किमान 10 + 2/ पदवीधर मार्क्स लिस्ट (3 वर्ष)/ पदविका (सहा सेमीस्टर), पाल्याच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची प्रत (पीएनबी/एसबीआय फक्त), पीआरओ ची प्रत 1 ते 5 वर्गवारीनुसार इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. क्रमांक 3, 4, 5, 6, 7 व 9 या तपशीलांकरिता सदर घटनेच्या दिनांकापासून एक वर्ष तर क्र. 10 या तपशीलाकरिता दि. 01 सप्टेंबर 2016 ते 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत असा कालावधी आहे. या योजनेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि.01 जून, 2016 पासून www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून कागदोपत्री अर्ज स्विकारले जाणार नाहीत. या तपशिलाच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण विभाग, पुणे व केएसबी सेक्रेटरिया हेल्पलाईन क्र. 011-26715250 (एक्सटेन्शन 215) यांच्याशी संपर्क साधावा.

पत्ता –

सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य,
'रायगड', दुसरा मजला, राष्ट्रीय युद्ध स्मारका समोर,
घोरपडी, पुणे – 411 001
दूरध्वनी क्र. – 020-66262605
ईमेल – resettle.dsw@mahasainik.com
वेबसाईट – www.mahasainik.com

No comments:

Post a Comment